पोस्ट्स

वेळ

 खुप दिवस झाले मनात होते gym join करायची. पण काही केल्या वेळ निघत नव्हता. किबहूना मी त्यात जास्त लक्ष देत नव्हते म्हणून वेळ निघत नसावा.  एक स्त्री म्हंटला ना खूप काही काम आणि सगळ्यांच्या वेळा ठररल्या असतात की त्या वेळी ते काम झालंच पाहिजे...एका वर एक अवलंबून असता. घरची काम आणि office. हे सगळं आवरून मग स्वतः साठी वेळ च काढायचा जरा अवघड आहे... पण ह्या वेळी मी जास्त विचार न करता gym join केली. काढला वेळ स्वतः साठी.. आणि आता मी दररोज gym ल 1 tass tari jate. एक समजला जो पर्यंत आपण वेळ देत नाही तोपर्यंत वेळ कसा निघेल ना.. म्हणून ना प्रत्येक स्त्री स्वतः साठी वेळ द्याला हवा...😁😁😁😁

MY SUNDAY....ITS NOT FUN DAY AT ALL.

 संडे ..... हा दिवस येतो वीक मधून एकदा . सगळे बोलतात संडे म्हणजे फन डे.  पण खूप महिलां साठी हा दिवस पण आरामाचा नसतो. हे मला आता समजत आहे. जेव्हा मला संडे असून सुद्धा खूप काम करावा लागत. मी लहान असताना संडे ला फक्त होम वर्क करून आराम करायची. आई मस्त नॉन व्हेज जेवण बनवायची. ते खायचा आणि खेळायचा एवढंच काम असायचा.   पण जेव्हा पासून लग्न झाला आहे तेव्हा पासून संडे ची मज्जा गेली. संडे ला नास्ता काय करायचा स्पेसिअल (special) त्याची तयारी शनिवार पासूनच करावी लागते. दर रविवारी कांदे पोहे करायचा बेत असतो आत्याबाई (सासूबाई) चा. पण मला नाही आवडत नेहमी रविवारी तेच तेच पोहे खायला. म्हणून मग इडली किंवा मेंदू वडा किंवा आप्पे असा काहीतरी बेत असतो. त्यामुळे रविवार असला तरी उठाव लागत लवकर.  नाश्ता बनवून झाला कि सगळयांना तो द्याचा. त्याची भांडी घासायची. मग त्या नंतर चहा ची फेरी असते. ते सगळं होता न होत तोपर्यंत ११ वाजून जातात. ११ वाजतात कारण मी एकटीच उठते लवकर बाकीचे संडे आहे म्हणून ९.३० पर्यंत उठतात. नाश्ता नंतर जेवणासाठी तयारी चालू करायची. संडे म्हणजे नॉन व्हेज जेवण हे आमच्या कडे...

kadhni

इमेज
 काढणी  दोन दिवस झाले काढणी चालू झाली. काढणी म्हणजे भात काढणी. माझा सासर मेढा सातारा. आमच्या कडे भात पिकतो. आम्ही म्हणजे ह्या वर्षी पासून मी पण. पहिला फक्त एकदा च भात काढणी साठी आली होते त्यानंतर पुन्हा कधी तसा योग  आला नाही पण ह्या वर्षी कोरोनो मुळे तोही योग आला 😊😊😊😊.  दर वर्षी फक्त मे महिना आणि गावची जत्रे  च्या वेळी गावी येन व्हयचा. ह्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनो मुळे गावी येन लवकर झाला आमचा. सह कुटुंब सहपरिवार आम्ही गावी आलो. फक्त नवरोबा सोबत नव्हते. बाकी लहान मोठे सगळे गावी आलो.  गावी जाऊन काय करावं हा मोठा प्रश्न होता माझया साठी. मला तसा खूप कंटाळा येतो गावी राह्यचं. लहान पानापासून फक्त मे महिना शाळे साठी सुट्टी असल्या मूळे मस्त जुन पर्यंत आम्ही सगळे भावंडे मज्जा करत सुट्टी घालवयचो. तेव्हा ची मज्ञ्ज वेगळी असायची. पण एकंदर मला जास्तीत  जास्त फक्त एक ते दोन महिनेच गावी बरं वाटत. त्या पेक्षा जर एक दिवस झाले तर मग कंटाळा येतो. पण हे वर्ष अपवाद आहे २०२० सुरु झाला तेव्हा वाटलं होता कदाचित क्रिकेट मध्ये कसा २०-२० असतो...

AAI....

इमेज
🙏🙏🙏🙏🙏आई आई  आमची आई ..... आई एक असा शब्द आहे जो उच्चरला तरी एक आत्मीय समाधान वाटते. आई बद्दल  जेवढे बोलू तेवढे अपुरे च आहे.  स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.... अस्स्स जे कुणी बोलला आहे ते खर् आहे. आई शिवाय काय अस्तित्व आसु  शकेल आपले  ...माज्या मते शून्य. आज मी हा ब्लॉग लिहू शकतेय त्या मागे कारण पण माजी आई च आहे. मी अश्या घरात जन्म घेतला तिकडे अगोदरच चार मुली चा जन्म झाला होता. एक मुलगा असावा म्हणून त्यांनी चार मुलींना जन्म दिला मग नंतर माझा भाऊ झाला एकूण ५ मुले झाली तरी अजून एक मुलगा असावा या वेड्या आशे  मूळे माझा पण जन्म झाला. आता आम्ही एकूण ६ भावंडे झालो. माझे वडील टॅक्सी ड्राइवर आई गृहिणी. वडील जेमतेम शिकले होते पण हुशार खूप. आई  च शिक्षण झाला नाही.  पण तरीही खूप हुशार व्यवहारात.  ती स्वतः शिकली नव्हती त्यामुळे तिला नेहमी वाटायचं माज्या मुलांनी खूप शिकवा. तिने कधी भेदभाव केला नाही. दादा आणि आम्हा मुलीं  मध्ये . कधीतरी करायची भेदभाव. पण मी सगळ्यात लहान असल्या मुळे जरा काही मन ...