kadhni

 काढणी 


दोन दिवस झाले काढणी चालू झाली. काढणी म्हणजे भात काढणी. माझा सासर मेढा सातारा. आमच्या कडे भात पिकतो. आम्ही म्हणजे ह्या वर्षी पासून मी पण. पहिला फक्त एकदा च भात काढणी साठी आली होते त्यानंतर पुन्हा कधी तसा योग  आला नाही पण ह्या वर्षी कोरोनो मुळे तोही योग आला 😊😊😊😊. 

दर वर्षी फक्त मे महिना आणि गावची जत्रे  च्या वेळी गावी येन व्हयचा. ह्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनो मुळे गावी येन लवकर झाला आमचा. सह कुटुंब सहपरिवार आम्ही गावी आलो. फक्त नवरोबा सोबत नव्हते. बाकी लहान मोठे सगळे गावी आलो. 

गावी जाऊन काय करावं हा मोठा प्रश्न होता माझया साठी. मला तसा खूप कंटाळा येतो गावी राह्यचं. लहान पानापासून फक्त मे महिना शाळे साठी सुट्टी असल्या मूळे मस्त जुन पर्यंत आम्ही सगळे भावंडे मज्जा करत सुट्टी घालवयचो. तेव्हा ची मज्ञ्ज वेगळी असायची. पण एकंदर मला जास्तीत  जास्त फक्त एक ते दोन महिनेच गावी बरं वाटत. त्या पेक्षा जर एक दिवस झाले तर मग कंटाळा येतो. पण हे वर्ष अपवाद आहे २०२० सुरु झाला तेव्हा वाटलं होता कदाचित क्रिकेट मध्ये कसा २०-२० असतो  तसा लवकरच संपले  पण हे तसा होतच नाही आहे. माज्या साठी खूप पोस्टिव्ह असा कारण मी ह्या वर्षी शेती शिकली. हो शिकली अशाच बोलायला हवा. ह्या अगोदर कधी हि जी गोष्ट केली नाही ती मी पहील्यांदा केली. काही तरी नवीन जे खरच शिकण्या सारखा आहे. 

 

हे आमचा शेत. जिकडे आम्ही दार वर्षी भात  पिकवतो.  तशी शेतं मोजकीच आहेत. ह्या वर्षी मी माज्या परिने जमेल तेवढी मद्त सासूबाई ना केली. एरवी शेती म्हंटली कि माज्या सासूबाई आणि सासूबाई च्या सासूबाई (म्हणजे माज्या आजी सासूबाई आम्ही त्यांना जीजी बोलतो) च सगळं करतात बाकी चे फॅमिली मेंबर्स थोडा फार हाथ भार  लावतात. लावणी करण्या अगोदर खूप प्रक्रिया असते. मला त्यातला एवढा काही माहित नाही. सासूबाई सोबत जायचा ते जे सांगतील ते ते करायचा. अगदी वावरा  (शेत) मधले छोटे छोटे दगड पण उचलून बाहेर बांधला फेकायचा काम मी केलं. लावणी अगोदर "तरवा" करावा लागतो. तरवा म्हणजे पाला पाचोळा गोळा करायचा आणि तो बर्न करायचा. मग थोड्या दिवसानी त्या तरवा केलेल्या ठिकाणी भाताचे बी पेरायचे. बी  पेरीयाच्या  पण खूप पद्धत आहेत. आम्ही बी पेरण्या अगोदर कुदळी ने सर्व तरवा खोदला मग बी हाथाने फेकले आणि नंतर पुन्हा  कुदळून बी आत मध्ये घातले अश्या प्रकारें  पेरणी केली. 


मग थोड्या दिवसानी त्यात खत टाकले. अगदी १५ दिवसा मध्ये रोप वाढीला पण लागले. मग आलं रोप काढायची वेळ. रोप काढताना पुरेसा पाणी लागत वावरत. पाणी नसेल तर रोप काढणं होऊ शकता नाही. रिमझिम पाऊस पडत असताना आम्ही  रोप काढायला सुरुवात केली. रोप काढणे म्हणजे अगदी सोपं फक्त हळूच ते उपटून काढायचा आणि जरा पाण्यात त्याची खालची बहुंड्यची बाजू पाण्यात बुडवायची आणि  धुवून काढायची आणि  एका रोपाने ती जुडी बांधची. असायचं प्र्कारे  जुड्या बांधायच्या आणि मागे मागे ठेवत जायच्या. हे  सोपं वाटलं होता पण नाही हेच काम जास्त वेळ घेणार आहे. पूर्ण दिवस जातो रोप काढायला. पण जास्त लोक असतली तर वेळ समजून येत नाही. दुपार झाली कि  यायचा मग तो डब्बा खायचा रानात. मला दिवस भरतं जास्त हीच वेळ आवडायची ती म्हणजे जेवणाची. मला लहान पण पासूनच खूप रानात जेवायला. ती इच्छा ह्या वर्षी पूर्ण 😊😊😊😊😊😊 

रोप काढल्या नंतर लावणी. लावणी ची पद्धत पण वेगळी ज्या वावरत लावणी करायची आहे त्यात चिखल करावा लागतो आणि चिक्ख्खाल पण एका machine ने केला जातो. चिखल कार्यन्य साठी पुरेसा पाऊस किंवा पुरेसा पाणी असावा लागत वावरत. 


पुरेसं  पाणी असण्यासाठी जे पावसाचा पाणी येत ते छोट्या छोट्या ओढ्या मुळे वावरत पूचवले जाते. पुचवला बोलायचं कारण असा कि सगळी कडे लावणी सुरु करतात सगळ्या वावरणं मध्ये चिखल करायचा असतो म्हणून बाकीचे शेतकरी पाणी अडवून स्वतःच्या शेत मध्ये नेतात. म्हणजे ज्या शेता मध्ये चिखल करायचा असतो तिकडे पाणी पुचवला जातो. 

चिखल झाला कि मग ज्या रोपाच्या मुळ्या( मुठी) केल्याल्या असतात त्या सर्व वावरत फेकतात मग दोन bhandana एक रशी धरली जाते आणि मध्ये सगळे जण रोप  करतात. रशी च्या पुढे एक रोप राशी जवळ अजून एक रोप आणि राशी च्या मागे अजून एक रोप अस्से तीन ओळी(line) अस्या प्रकारे पूर्ण शेत लावलं जात. 

आता काढणी चालू आहे काढणी तशी काही अवघड नाही. वरती सांगितल्या प्रमाणे तीन ओळी असतात एक सारख्या लावलेल्या त्या मुळे काढायला पण सोपं असता. 


रोप जे लावले असता ते मुळाच्या थोडा वर पकडून मग विळ्या ने खाली बुंध्याला ला कापायचा. तीन ओळी एकत्र कापले के मग सरळ ओळी कापल्या जातात. मग ते एक  ठेवला जात. अश्या पद्धती ने  सगळं रोप काढून झाले कि मग जर भात हिरवा  दिसत असेल तर एक दिवस सुकवला जातो मग  दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर जाऊन  इंगा  (मोळी) करायला लागतात. मग भात बडवण्या साठी सगळी तयारी केली जाते. 


  हे अश्या प्रकारे अंथरून केलं जात भात बडवण्या साठी. मग एक एक करून यांगा त्या वर जोरात आपटल्या जातात मग त्यातून भात खाली पडतो. त्या मध्ये बरीच घाण म्हणजे भाताचे रोप किंवा दगड किंवा पाला पाचोळा जातो तोच सुपाच्य साह्याने बाजूला केला जातो मग जर वर असेल तर भात varlya दिला जातो. जेणे करून काही घाण असेल तर ती वेगळी होईल. पण हे सगळं डिपेंड आहे निसर्ग वर. जर वारा नसेल तर ते सगळं गोणी मध्ये भरून घरी आणून ठेवायचा. 


घरी आणल्यावर पण त्याला varyala द्यावा लागत. सुकवावा लागत. बरेच काम असता पीक काढायला नंतर पण. 


हे सगळं केल्या मुळे मला  एक गोस्ट समजली कि शेतकरी खूप खूप कष्ट करतो. आणि जे काही कष्ट करतो  result पण त्याच्या हातात नसतो. सगळं काही निसर्ग वर डिपेंड असता. 


हे सगळं जे भात पेरणी पासून ते काढणी पर्यंत जो काही वेळ लागतो तो कमीतकमी ६ महिने चा असतो. 

हे सगळं सांगायचं कारर्ण कि खूप जण अजून पण जेवण पूर्ण संपवत नाहीत. खूप अन्न अजून पण वाया जात.


हे सगळं करत असताना मला थोडासा लागला. हे आहे गावठी बॅंडेज. 





 हे सगळे कष्ट करून फार छान वाटलं. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

AAI....

MY SUNDAY....ITS NOT FUN DAY AT ALL.