MY SUNDAY....ITS NOT FUN DAY AT ALL.
संडे ..... हा दिवस येतो वीक मधून एकदा . सगळे बोलतात संडे म्हणजे फन डे.
पण खूप महिलां साठी हा दिवस पण आरामाचा नसतो. हे मला आता समजत आहे. जेव्हा मला संडे असून सुद्धा खूप काम करावा लागत. मी लहान असताना संडे ला फक्त होम वर्क करून आराम करायची. आई मस्त नॉन व्हेज जेवण बनवायची. ते खायचा आणि खेळायचा एवढंच काम असायचा.
पण जेव्हा पासून लग्न झाला आहे तेव्हा पासून संडे ची मज्जा गेली. संडे ला नास्ता काय करायचा स्पेसिअल (special) त्याची तयारी शनिवार पासूनच करावी लागते. दर रविवारी कांदे पोहे करायचा बेत असतो आत्याबाई (सासूबाई) चा. पण मला नाही आवडत नेहमी रविवारी तेच तेच पोहे खायला. म्हणून मग इडली किंवा मेंदू वडा किंवा आप्पे असा काहीतरी बेत असतो. त्यामुळे रविवार असला तरी उठाव लागत लवकर.
नाश्ता बनवून झाला कि सगळयांना तो द्याचा. त्याची भांडी घासायची. मग त्या नंतर चहा ची फेरी असते. ते सगळं होता न होत तोपर्यंत ११ वाजून जातात. ११ वाजतात कारण मी एकटीच उठते लवकर बाकीचे संडे आहे म्हणून ९.३० पर्यंत उठतात. नाश्ता नंतर जेवणासाठी तयारी चालू करायची. संडे म्हणजे नॉन व्हेज जेवण हे आमच्या कडे समीकरण आहे. मग चिकन चा जेवण बनवायला लागतो अजून २ ते ३ तास तरी. मध्ये मध्ये भांडी घासणे लादी पुसणे हि काम काम करावी लागतात. अश्श्या तऱ्हीने जेवण झाला कि मग जेवायला बसायचा कि त्यात अर्धा तास जातो. मग पुन्हा भांडी घासायची तयारी. सगळी काम होतात तो पर्यंत दुपारचे ३.३० तरी वाजतात. मग जरा आराम म्हणून झोपयचा. झोप तशी पण काही लागत नाही मला. मग थोड्या वेळात चहा ची वेळ होते. पुन्हा चहा ठेवून तो सगळयांना द्याचा थोडा वेळ T.V. बघायची मग बत्ती वगैरे झाली कि संध्याकाळी कधीतरी जातो मॉल ला किंवा गार्डन मध्ये फिरायला. ठेवढंच थोडा चांगले वाटते. मग तिकडून येवन जेवण बनवायचा ते जेवायचं कि पुन्हा भांडी आहेतच घासायला. हे सगळं होई पर्यंत रात्रीचे १०.३० होतात.
झोपायला कमीत कमी ११ किंवा ११.३० तरी होतात. असा असतो संडे नो आराम डे.
संडे ला सगळयांना खूप छान वाटत पण मला नाही वाटत कधी. कारण इतर दिवशी पण मी तेवढीच काम करते पण संडे ला सगळे घरी असल्यामुळे सगळ्या ना उठायला उशीर होतो. म्हणून सगळी काम पण उशिरा होतात. असा संडे मला वाटतो पुन्हा यायलाच नको. 😞😞😞😞😞😔😔
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा